नारायण नागबळी पूजा त्र्यंबकेश्वर
नारायण नागबळी पूजा का केली जाते ?
जर एखाद्या व्यक्तीने नागाची हत्या केली असेल, किंवा कोना कडून करवली असेल, किंवा कोणी हत्या करतांना त्यात सामील असेल तर तेव्हा अशा व्यक्तीस नाग हत्येचे समान पाप लागते, त्यामुळे हा दोष त्याचा कुंडलीत निर्माण होतो. म्हणून अशा प्रकारे या पापाचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यात येऊन दुःखप्राप्ती होते. त्यासाठी हा दोष निवारणासाठी नारायण नागबळी विधी करावा लागतो.आपल्या परिवारात किंवा मागील पिढीमध्ये एखादा व्यक्तीचा नकळत अचानक मृत्यू झाला असेल तर त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी, यासाठी हा विधी केला जातो. नकळत मृत्यू हे अनेक प्रकारचे असतात, परंतु मुख्यत्वे खालील प्रकारचे मृत्यू दुर्मरनात मोडले जातात.
१. अपघातात मृत्यू होणे.
२. आत्महत्या केल्याने मृत्यू होणे.
३. घरातून निघून जाणे.
४. संतती न होता मृत्यू होणे.
५. पैश्याचा लोभापायी मृत्यू होणे.
वरील मुख्य कारणांमुळे परिवारातील मेमेल्या व्यक्तीच्या जन्म पत्रिकेत पितृदोष निर्माण होतो. म्हणून त्याचा निवारणासाठी नारायण नागबली विधी केली जाते.
नारायण बळी पूजा
जर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक अनैसर्गिक पणे मृत्यू झाला असेल तर, अश्या व्यक्तीला आत्मशांती मिळत नाही, कारण अश्या व्यक्तींचा काही इच्छा, अपेक्षा ह्या अपूर्ण राहतात. म्हणून अश्या वेळी त्या व्यक्तीला मृत्यूनंतर सदगती मिळावी त्यासाठी नारायण नागबळी पूजा केली जाते.जेव्हा व्यक्तीला त्याचा मूळ नैसर्गिक मृत्यूसमय येण्याचा अगोदर म्हणजेच अकाली मृत्यू येतो किंवा आत्महत्या केलेल्या माणसाचे शास्त्रानुसार आत्मशांती प्रित्यर्थ श्राद्धविधी न केल्यास अश्या व्यक्तीचे दुर्मरणामुळे दिवात्म्यास गती प्राप्त होत नाही.
नागबळी पूजा :
आपल्याला अनेक वेळेस पाहायला मिळते कि एखादी व्यक्ती साप किंवा नाग दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्या घरातील कोणी एका व्यक्ती कडून नकळत नागाची हत्या केली असेल, अशा नागाला आत्मशांती लाभत नाही. यामुळे त्याचा आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, अश्या मुले घरातील व्यक्तींना त्रास होतो. म्हणून या त्रासातून मुक्तता हवी असेल तर मृत्युलोकी भटकणाऱ्या नागाच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी नागबळी पूजा करणे आवश्यक आहे. संपूर्ण भारतात नागबळी पूजा केवळ त्रयमबकेश्वर परिसरातच केली जाते.नारायण नागबळी पूजा न केल्यास कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते ?
संतति न होणे किंवा गर्भपात होणे.
कुटुंबात कलह निर्माण होणे.
अकाल मृत्यू होणे जसे आत्महत्या, खून, भ्रूणहत्या, अपघात.
स्वप्नात नाग दिसणे किंवा काही अकस्मात अघटित घडत असताना दिसणे.
घरातील सुवासिनीस खिन्नता वाटणे, भीती वाटणे, सतत अस्वस्थता वाटणे, असुरक्षित वाटणे.
घरातून एखादी व्यक्ती पळून जाणे.
धंद्यात नुकसान होऊन कर्जबाजारी होणे, कर्ज वसुलीसाठी माणसे घरी येणे.
भाऊबंदकीत नुकसान होणे, जमिनीचे व्यवहार ठप्प होणे.
सारखे-सारखे कोर्ट कचेऱ्यांमध्ये जावे लागणे.
नोकरीच्या ठिकाणी अपयश येऊन काम सुटणे.
नोकरीत प्रमोशन न मिळणे.
नोकरी अगर धंद्यात लक्ष न लागणे.
सततचे आजारपण मागे लागणे.
घरातील लहान मुलांना वारंवार त्रास होणे जसे पुरेसे जेवण न करणे, झोपेत ओरडून उठणे, झोप पूर्ण न होणे, अभ्यासात लक्ष न लागणे इत्यादी.
घरात सतत अशांतिचे वातावरण असणे.
घरातील व्यक्ती वाममार्गाला लागणे उदा. परधन, व्यसन, परदार, परनिंदा.
भांडणे होऊन घटस्फोट होणे किंवा जमलेले लग्ने मोडणे.
त्र्यंबकेश्वर मध्ये नारायण नागबळी पूजा कुठे केली जाते?
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केल्या जाणाऱ्या सर्व धार्मिक विधींपैकी एक म्हणजे नारायण नागबळी पूजा. हि पूजा पूर्ण ३ दिवस चालते. त्रयम्बकेश्वर मंदिर परिसरात मंदिराच्या पूर्व दरवाज्याला स्थित अहिल्या गोदावरी संगम व सतीचे महास्मशान येथे नारायण नागबळी पूजा केली जाते. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये नारायण नागबळी पूजा विधी विधानाचे महत्त्व सांगितले आहे.नारायण नागबळी पूजा केव्हा करावी ?
इच्छित फळ मिळण्यासाठी नारायण नागबळी पूजा विधी हा शुभ मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. जेव्हा दिवसाची सुरुवात २२ व्या चंद्र स्थानापासून झाली असेल तेव्हा संतती प्राप्तीसाठी नारायण नागबळी पूजा त्या दिवशी करणे उचित मानले जाते. असे सुद्धा म्हटले जाते की चंद्र पंधरवड्याचा ५ वा आणि ११ वा दिवस नारायण नागबळी विधी करण्यासाठी सर्वात योग्य आहे. हस्त नक्षत्र, पुष्य नक्षत्र, किंवा आश्लेषा नक्षत्र अश्या नक्षत्रांवर हा विधी करणे योग्य आहे. तसेच इतर नक्षत्रांच्या दिवशी जसे मृग, अर्ध, स्वाती म्हणून विधी केला जाऊ शकतो. दिवसांपैकी रविवारी, सोमवारी आणि गुरुवारी हा विधी करणे उचित आहे.प्रत्येक व्यक्तीचा शुभमुहूर्त हा त्याच्या असणाऱ्या इच्छा/काम्य, त्याच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती यानुसार शुभमुहूर्त हा वेगवेगळा असल्या कारणाने त्र्यंबकेश्वर येथील ताम्रपात्रधारी गुरूजींसोबत संवाद साधूनच येथे पूजा करावी. येथील गुरुजी संबंधित सर्व माहिती आपणांस देतील. या पोर्टलवरील अधिकृत गुरुजींसोबत तुम्ही संवाद साधू शकता. "धनिष्ठा पंचक" नारायण नागबळी करण्यासाठी योग्य नाही. नारायण नागबळी ही पूजा गुरुजींकडून उपलब्ध तारखांना शुभ मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केली जाते.
नारायण नागबळी पूजा कोण करू शकतात ?
शास्त्रानुसार नारायण नागबळी पूजा हि पुरुष एकट्याने करू शकतो, परंतु स्त्रीला एकट्याने हि पूजा करता येत नाही.
कुटुंबातील सदस्यांच्या उन्नतीसाठी एकटे विधुर सुद्धा नारायण नागबळी पूजा विधी करू शकतात.
संतती प्राप्तीसाठी दांपत्य देखील हा विधी करू शकतात.
गर्भवती महिलेस (सात महिन्यांच्या गर्भअवस्थेपर्यंत) हा विधी करण्याची अनुमती आहे.
विवाहासारख्या पवित्र कार्यानंतर हिंदू १ वर्षापर्यंत हा विधी करू नये (बाकी कुठल्याही पवित्र कार्यानंतर हा विधी करता येतो).
जर पालकांचे निधन झाले असेल तर, मृत्यूच्या एका वर्षानंतर हा विधी करू शकतात.
नारायण नागबळी पूजेचे फायदेः
चांगले आरोग्य तसेच यश प्राप्त होतेवडिलोपार्जित शापापासून मुक्ती मिळते
पितृ दोषाचे दुष्परिणाम दूर होतात
व्यवसायात यश प्राप्त होते
दांपत्यास संतती प्राप्ती होते
वाईट स्वप्नांपासून (जसे सापाच्या दंशाने मृत्यू) सुटका होते
नारायण नागबली पूजा मूल्य दक्षिणा:
पूजा मूल्य / दक्षिणा ही पूर्णतः पूजेसाठी आवश्यक वस्तूंवर (पूजा सामग्री) अवलंबून आहे. नारायण नागबळी पूजा संपन्न झाली की पुरोहितांना दक्षिणा देऊन ह्या विधीची सांगता होते.नारायण नागबली पूजे साठी काही नियम आणि सुचना :
एकदा नारायण नागबळी पूजा सुरू झाल्यावर भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान सोडून कोठेही जाण्याची परवानगी नाही.
सर्व भक्त पूजेच्या दिवसांत केवळ ब्राह्मणांनी प्रदान केलेले सात्विक (कांदा आणि लसूण वर्जित) भोजन ग्रहण करू शकतात .
पूजा करतेवेळी पांढरे वस्त्र परिधान करावे. (जसे पुरुषांसाठी पांढरे धोती, गमछा, रुमाल, आणि स्त्रियांसाठी पांढरी साडी).
ज्या समयी नारायण नागबळी पूजा आयोजित केली असेल त्याच्या १ दिवस अगोदर यजमानांनी त्र्यंबकेश्वर मध्ये उपस्थित राहावे.
हा विधी केल्यावर भाविक एक दिवसासाठी सूतक पाळतात. त्यात त्यांना कोणालाही स्पर्श करण्याची अनुमती नाही व कोणाच्या घरी अथवा शुभ कार्याला जाता येत नाही.
गुरुजींनी नेमून दिलेल्या नियमांप्रमाणेच ३ दिवस वास्तव्य करावे

